Pune –  लिफ्टमध्येच झाली तब्बल सव्वादोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज –  लिफ्टमधून जाताना जबरदस्तीने सव्वादोन लाखांची रोकड चोरून नेल्याची  घटना  एका तरूणासोबत शनिवारी (दि.13) रात्री साडेआठ वाजता नाना पेठ येथील चॉईस गार्डन या इमारतीच्या लिफ्टमध्ये घडली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी जितेंद्र माली (वय 26, रा. गंजपेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार ,फिर्यादी  जितेंद्र हे  इमारतीच्या लिफ्टमधून नेहमीप्रमाणे जात असताना त्यांच्याजवळ एकजण आला व त्याने फिर्यादीला बॅग छोडो नही तो मार डालुंगा अशी धमकी देऊन घाबरवले व फिर्यादी जवळील काळ्या रंगाच्या बॅगेतील तब्बल 2 लाख 25 हजार जबरदस्तीने
हिसकावून घेऊन बाहेर दूचाकीवर थांबलेल्या साथीदारासोबत गाडीवर निघून गेला.

याप्रकरणी दोन अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पुढील तपास समर्थ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.