रविवार, सप्टेंबर 25, 2022

Shirgaon : शिरगाव येथील भारत यात्रा ट्रस्ट केंद्रच्या सामानाची चोरी व तोडफोड

एमपीसी न्यूज – शिरगाव (Shirgaon) येथील परंदवाडी येथील भारत यात्रा ट्रस्ट केंद्र येथील सामानाची, खोल्यांची तेडफोड करुन तेथील सामानांचीही चोरी झाली आहे. यात सात लाख रुपयांचे नुसकान झाले असून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार 25 जुलै रोजी उघडकीस आला असून मंगळवारी (दि.9) शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी यशवंत हरी यादव (वय 38 रा. बाणेर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Early Intervention Centre : पुण्यात पहिले जलद अपंगत्व निदान आणि उपचार केंद्र स्थापन

पोलिसांनी दिलेल्या (Shirgaon) माहितीनुसार, भारत यात्रा केंद्र येथे कामगारांसाठी बांधलेल्या दहा खोल्यांची, आचार्य भवन, गांधी कुटी, एस.एम जोशी भवन, आंबेडकर भवन, गोशाळा यांचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच, खोळ्यांचे पत्रे, लोखंडी रॉड, अँगल, खिडकीचे गज, खोलीतील बेड, भांडी चोरून नेले आहे. केंद्राची लावलेली पाटी ही खाली तोडून टाकली आहे. मालमत्तेचे नुकसान व सात लाख रुपयांची चोरी चोरट्यांनी केली आहे. यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news