Osmanabad news: उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरीच्या घटना, किमती वस्तूंसह चपलांवरही चोरट्यांचा डल्ला

Theft at five places in the Osmanabad district.

एमपीसी न्यूज – उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीदरम्यान पाच ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाइल, विद्युत साहित्य आणि चप्पलावर डल्ला मारला आहे. 

उस्मानाबाद शहरातील सांजा रोड येथील सर्वे क्र. 217/5 प्लॉट क्र. 156 येथील 80 हजार रुपये किंमतीचे महावितरण कंपनीचे रोहित्र व त्यासाठी लागणारे खांब असा मुद्देमाल दि.6 व 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. याप्रकरणी महावितरण उस्मानाबाद शहर शाखेचे सहायक अभियंता अशोक चाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर उस्मानाबाद तालुक्यातील दुधगाव शिवारातील तेरणा नदी पुलाजवळील सुजित नारायण चणे, रा. कुरुदा, ता. वसमत हे दि.10 रोजी स्वीफ्ट कार रस्त्याने चालवत होते. यावेळी रस्ता खराब असल्याने ते कार सावकाश चालवत असतांना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील रेडमी-8 मोबाईल फोन घेवून पळून गेला. याप्रकरणी सुजित चणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला आहे.

त्याचबरोबर उमरगा शहरात गणेश नगर येथील वैभव माणिकराव मालखरे यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चारेट्याने कापून आतील 17 ग्रॅम सोन्याचे गंठण चोरुन नेले. यात वैभव मालखरे यांनी यांच्या फिर्यादीवरून 454, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तसेच कळंब तालुक्यातील गोविंदपुर येथील उत्रेश्वर उत्तम जाधव व त्यांचे शेजारी- भाग्यवंत बाबुराव घुगे अशा दोघांच्या घराचे कुलूप अज्ञात चारट्याने दि.9 व 10 रोजीच्या मध्यरात्री तोडून दोघांच्या घरातील  65 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, विवो मोबाईल फोन-1 व रोख रक्कम 1 लाख 10 हजार रुपयेचा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या उत्रेश्वर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी जवळील करजखेडा येथील धनाजी पांडुरंग वाघमारे यांच्या करजखेडा येथील ‘बालाजी फुटवेअर’ दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने  उचकटून आतील व्हिकेसी, पैरागॉन, वरजीन व इन्डास कंपनीचे चप्पल एकूण 75 नग  चोरुन नेले आहेत. याप्रकरणी धनाजी वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.