Charholi News : च-होली मधील वाघेश्वर महाराज मंदिरात चोरी

एमपीसी न्यूज – च-होली बुद्रुक मधील श्री वाघेश्वर महाराज मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. मंदिरातील तीन दानपेट्यातून तीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. तसेच सीसीटीव्हीची वायर तोडून दानपेट्यांचे कुलूप तोडून त्यांचे नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री दहा ते बुधवारी (दि. 4) पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत घडली.

ज्ञानेश्वर विठ्ठल पठारे (वय 48, रा. च-होली बुद्रुक) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत च-होली मधील श्री वाघेश्वर महाराज मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील तीन दानपेट्यातील सुमारे 30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. तसेच मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केबल वायर तोडली. दानपेट्यांचे कुलूप तोडून त्यांचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.