Pune Crime News : पुण्यातील कामगार उपायुक्त कार्यालयात चोरी; संगणक, पंखे लांबविले

एमपीसी न्यूज : शहरातील जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात असलेल्या कामगार उपायुक्त कार्यालयातून चोरट्यांनी संगणक तसेच सीपीयू, तीन पंखे चोरल्याची  घटना उघडकीस आली.

ही घटना 26 फेब्रुवारी  ते 1 मार्च दरम्यान घडली आहे. याप्रकरणी  कामगार उपायुक्त कार्यालयातील निरीक्षक प्रशांत वंजारी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान विभाग कार्यालय एका शेडमध्ये आहे. 26 फेब्रुवारी  ते 1 मार्च दरम्यान चोरट्यांनी शेडचा पत्रा उचकटून संगणक, सीपीयू यंत्र, तीन पंखे असा 22 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी  पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी तपास करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.