Nigdi : निगडी प्राधिकरणमधील बंगल्यात चोरी

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरणमधील एका बंगल्यात चोरट्यांनी चोरी केली. रोख रक्कम व महागडे घड्याळ चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी अकरा ते दुपारी साडेचार या कालावधीत घडली.

अदिती अरुण शहा (वय 24, रा. संभाजी चौक, निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अदिती आणि त्यांची मैत्रीण संभाजी चौकाजवळ श्रीकृष्ण बंगल्यात भाड्याने राहतात. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास त्या बंगल्याला कुलूप लावून कामासाठी गेल्या. दुपारी साडेचारच्या सुमारास अदिती घरी आल्या असता घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. खिडकीचे ग्रील कापून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून रोख रक्कम आणि महागडे घड्याळ, असा एकूण 15 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.