Nigdi : गॅरेजमध्ये चोरी; 70 हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरटयांनी गॅरेजच्या खिडकीतून गॅरेजमध्ये येऊन गल्ल्यात ठेवलेले 70 हजार रुपये चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री आठ ते शनिवारी (दि. 15) सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान आकुर्डी येथील विठ्ठलवाडी परिसरात घडली.

अनिल आनंदा जाधव (वय 38, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांचे विठ्ठलवाडी येथे गॅरेज आहे. शुक्रवारी त्यांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गॅरेज बंद केले. रात्री अज्ञात चोरट्याने गॅरेजच्या खिडकीतुन प्रवेश केला. लाकडी ड्रॉव्हर मधील 70 हजार रुपये चोरून नेले. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जाधव यांनी गॅरेज उघडले. त्यावेळी गल्ल्यात ठेवलेले पैसे गायब असल्याचे दिसले. यावरून निगडी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. तपास निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही एस वल्टे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.