BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : उघड्या दरवाजातून प्रवेश करून 35 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजातून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातील एक लॅपटॉप, मोबाईल असा 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना वाकड येथे गुरूवारी घडली.

धनंजय प्रदीप साळुंके (वय-28, रा. थेरगाव, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्याकडून गुरूवारी सकाळी आठ वाजता घराचा दरवाजा उघडा राहिला होता. या उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील 20 हजारांचा एक लॅपटॉप, 15 हजारांचा 1 मोबाईल असा 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Advertisement