मंगळवार, जानेवारी 31, 2023

Crime News : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतून 49 बॅटऱ्यांची चोरी

एमपीसी न्यूज – निघोजे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतून (Crime News) 49 बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि. 2) उघडकीस आला.

याप्रकरणी महेंद्र घोरपडे (वय 42) यांनी म्हाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : हमी भावाने भात खरेदी अन् तात्काळ पैसे मिळाल्याने मावळ मधील भात उत्पादक शेतकरी सुखावला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या एक्सयूव्ही 700 च्या मटेरियल स्टोअर रूममध्ये एक्साईड आणि अमर राजा कंपनीच्या बॅटऱ्या ठेवल्या आहेत. (Crime News) 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत स्टोअर रूम मधून 1 लाख 47 हजार 28 रुपये किमतीच्या 49 बॅटऱ्या चोरीला गेल्या. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

Latest news
Related news