Bhosari : दुकानाचे शटर उचकटून 58 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज – दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 58 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना भोसरी येथे शनिवारी (दि. 31) सकाळी उघडकीस आली.

सुबोध भवानीसिंह रजपूत (वय 31, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोध यांचे जय गणेश साम्राज्य, भोसरी येथे स्मिता एन्टरप्रायझेस नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री सुबोध यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. शनिवारी सकाळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतील 58 हजार रुपयांच्या जुन्या नव्या बॅटऱ्या चोरून नेल्या. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.