Bhosari : रिकाम्या गॅस सिलिंडरची चोरी

एमपीसी न्यूज – गॅस संपल्याने घराबाहेर ठेवलेला सिलिंडर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान बालाजीनगर भोसरी येथे घडली.

वंदना राहुल सावंत (वय 34, रा. बालाजीनगर भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरटा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना यांनी गॅस संपलेला सिलेंडर घराबाहेर ठेवला. अज्ञात चोरट्यांनी शंभर रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीचा मोकळा सिलिंडर चोरून नेला. हा प्रकार 14 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. वंदना यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.