Bhosari : बँकेची गोपनीय माहिती चोरून 54 हजार लंपास

एमपीसी न्यूज – बँकेची गोपनीय माहिती चोरून त्याद्वारे वृद्ध महिलेच्या खात्यावरून 53 हजार 955 रुपये काढून घेतले. हा प्रकार एमआयडीसी भोसरी येथे ऑगस्ट महिन्यात घडला आहे.

सेरेना जेरी डिसुझा (वय 59, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसुझा यांना क्रेडीट कार्डवर रिवॉर्ड पॉईन्ट मिळाले असल्याची एक लिंक मेसेजच्या माध्यमातून एका अज्ञात नंबरवरून पाठवण्यात आली. त्या लिंकला डिसुझा यांनी क्लिक केले. त्यावेळी त्यांच्या बँक खात्याची आणि क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून डिसुझा यांच्या खात्यावरून 53 हजार 955 रुपये काढून घेतले. यावरून डिसुझा यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश नांदुरकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.