Dighi : कन्स्ट्रक्शन साईटवरून पाच लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – डुडुळगाव येथील अर्बनिया रियल्टी कन्स्ट्रक्शन साईट येथे चोरट्याने सामान व रोख रक्कम असा एकूण 5 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.(Dighi) हि चोरी गुरुवारी (दि.23) ते शनिवार (दि.25) या कालावधीत घडला आहे.

 

याप्रकरणी योगेश बबन तळेकर (वय 42 रा.डुडुळगाव) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

Dehu gaon : रिक्षाला धक्का लागला म्हणून तरुणाला बेदम मारहाण, तरुणाच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्बिनिया मंगलम या बांधकाम प्रकल्पाचे ऑफिस बंद असताना चोरट्याने साईटवरील 2 लाख रुपयांचे प्लबिंग मटेरिअल व ऑफिस मधून 3 लाख रुपये (Dighi) रोख असा एकूण 5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेले. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.