Chakan : ज्येष्ठ महिलेच्या घरात पाउण लाखाची चोरी

Theft of Rs. 1.45 lakh at senior citizen's home in Chakan area.

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ महिला राहत असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करत 75 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 23) पहाटे पावणेएक वाजताच्या सुमारास हळमवस्ती, बहुळ गाव येथे घडली.

वैभव बाळासाहेब वाडेकर (वय 24, रा. बहुळ हळम वस्ती, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडेकर यांची आजी राहत असलेल्या घरात बुधवारी पहाटे पावणेएक वाजताच्या सुमारास उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला.

घरातील डब्यात ठेवलेले 60 हजार रुपयांच्या सहा सोन्याच्या पुतळ्या, 15 हजार रुपये किमतीच्या कानातील कुड्या असे एकूण 75 हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटा पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.