Moshi News : संत नगरमध्ये उघड्या दरवाजावाटे दीड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – संत नगर मोशी येथील एका घरात एकटी वृद्ध महिला असताना अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजा वाटे प्रवेश केला. घरातून एक लाख 42 हजरांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री पावणे सात ते नऊ वाजताच्या कालावधीत घडली.

याबाबत रोहित अनिल भन्साळी (वय 33, रा. संत नगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री फिर्यादी भन्साळी यांच्या आजी एकट्याच घरी होत्या. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना  घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून कपाटाची चावी घेऊन कपाटाचे ड्रॉवर उघडून चोरट्यांनी 43.5 ग्रॅम सोन्याचे, 8 तोळे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.