Pimpri : डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दोन लाख 87 हजारांची चोरी

Theft of Rs. 2 lakh 87 thousand from Dr.D.Y.Patil Medical College,Pimpri.

एमपीसी न्यूज – एका कामगाराने दोन लाख 87 हजार 600 रुपयांचे लिफ्टचे साहित्य चोरून नेले. ही घटना पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेमध्ये रविवारी (दि. 18) सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली. त्याची ही चोरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बाजीराव विलास शिर्के (वय 39, रा. नंदादिप कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मयुर राजेंद्र तरवटे (वय 29, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी बुधवारी (दि. 21) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरवटे यांचे पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये काम सुरू आहे. आरोपी कामगार शिर्के याने 18 ऑक्‍टोबर रोजी सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास दोन लाख 86 हजार रुपये किंमतीचे लिफ्टचे दोन कंट्रोल आणि एक हजार 600 रुपयांच्या पत्र्याच्या दोन प्लेट असा एकूण एक लाख 87 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

त्याची ही चोरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.