Crime News : थेरगावमधील घरातून 5.88 लाख रुपयांची चोरी

एमपीसी न्यूज -थेरगावमधील घरातून 10 तोळे सोन्याचे दागिन्यांसहित 3.5 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 5.88 लाख रुपयांची चोरी (Crime News) करण्यात आली.

 

 

याबाबत अजित कदम, (वय 21, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

29 जुलै संध्याकाळी 5 पासून ते 3 ऑगस्टच्या दुपारी 1 पर्यंत खिडकीचे गज तोडून (Crime News) चोरट्याने आत प्रवेश करून 10 तोळे वजनाचे सोन्याच्या दागिन्यांसहित 3.5 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 5 लाख 88 हजार 750 रुपये चोरून नेले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.