Bhosari : शॉपच्या छताचा पत्रा उचकटून पावणे दोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – शॉपच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्याने पावणेदोन लाखांचे मटेरियल चोरून नेले. ही घंटा भोसरी एमआयडीसी येथील आनंदनगर परिसरात गुरुवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली.

आबासाहेब दत्तात्रय येळे (वय 42, रा.चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी येळे यांचे भोसरी एमआयडीसी परिसरात आनंदनगर येथे शॉप आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे शॉप बंद केले. दरम्यान अज्ञात चोरटयांनी शॉपचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. शॉपमधील 1 लाख 75 हजार रुपयांचे मटेरियल लंपास केले. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास येळे शॉप उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.