Chakan : गोडाऊनचे शटर उचकटून चोरी; चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – गोडाऊनचे शटर उचकटून गोडाऊनमध्ये ठेवलेले पार्ट चोरटयांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवार (दि. 31) दुपारी साडेचार ते शनिवार (दि. 1) सकाळी सात वाजण्याचा दरम्यान चाकण येथे घडली.

विजयनय नारायणन नायर (रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायर यांचे चाकण येथे गोडाऊन आहे. त्यामध्ये ते टाटा कंपनीचे असेम्ब्ली स्टेशनर ठेवतात. शुक्रवारी गोडाऊनमध्ये एकूण 732 स्टेशनर ठेवले होते. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास नायर यांनी गोडाऊन बंद केले. रात्री अज्ञात चोरटयांनी गोडाऊनचे शटर उचकटून गोडाऊनमध्ये ठेवलेले असेम्ब्ली स्टेशनरचे 4 लाख 11 हजार 210 रुपये किमतीचे  732 नग चोरून नेले. शनिवारी सकाळी नायर गोडाऊनकडे गेले असता हा प्रकार उघडकीस आला. यावरून चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.