Akurdi : अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेतर्फे २२ ऑक्टोबरपासून भूलशास्त्र प्रदर्शन

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथे अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटना पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने भूलशास्त्र प्रदर्शन – भूलतज्ञ आपल्या भेटीला हे दृक-चित्र पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे.

आकुर्डी येथील भालेराव कान, नाक, घसा हॉस्पिटल येथे हे प्रदर्शन भरणार आहे. अशा प्रकारचे पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. या प्रदर्शनाची संकल्पना डॉ. माया भालेराव यांची असून जनजागृतीपर भूलशास्त्रावर प्रकाशझोत टाकणारे प्रदर्शन आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष डॉ. शोभा जोशी यांनी दिली.

हे प्रदर्शन दि. 22 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत खुले राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.