Pimpri : पूरग्रस्तांसाठी वाहत आहे मदतीचा ओघ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून विविध संस्था, मित्र मंडळ, संघटना यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ वाहत आहे. नेहरूनगर येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील कार्यक्रमाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तू व १० हजार रुपयांचा धनादेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात सुपूर्त करण्यात आला.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यावेळी लाखो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही जिल्हे पाण्याखाली गेल्यामुळे या भागात महापूर आल्याने अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोक या महापुरात जागोजागी अडकले आहेत. या सर्व कुटुंबांना सध्या मदतीची आवश्यकता असल्याने याचे गांभीर्य ओळखून नेहरूनगर येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील कार्यक्रमाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांना तांदूळ, पाणी बॉटल, बिस्किटे, चिक्की, राजगिरा लाडू, मॅगी, मेणबत्ती, कोलगेट, फरसाण, खजूर, केक, ओआरएस पावडर आदी जीवनावश्यक वस्तू पुण्यातील विधानभवन येथे देण्यात आल्या. तर १०,००० रुपयांचा धनादेश देखील पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात पुनर्वसन अधिकारी एम. ए. शेख व सचिन लहाने यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरातील इतरही मंडळांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर मदत करण्याचे आवाहन देखील मंडळाच्या वतीने यावेळी करण्यात आले. यावेळी मंडळाचे विजय जमदाडे, सागर खरात, सागर सूर्डी, संजय गंगावणे, सागर जाधव, भारत एक्सप्रेसचे पत्रकार जमीर सय्यद, अनिकेत भोंडवे अक्षय पासलकर मयुर पोटावडे, संतोष बावडेकर, ऋषिकेश मोरे, ऋषिकेश मोहिते, उमेश बिराजदार, शुभम धावरे, ओमकार पवार, नारायण गायकवाड, राहुल खडके, आदम पठाण, प्रशांत खडके, गणेश गायकवाड, फिरोज खान, धनराज चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी घरकुलच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत घरकुल परिसरातील किराणा व दुकानदार, रहिवासी यांनी एक टेम्पोभर खाद्यपदार्थ, कपडे, चादर, ब्लँकेटचा स्वीकार करून रस्तेमार्गाने पाठविण्यात आली. घरकुल परिसरात आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग, विविध धर्माचे मध्यमवर्गीय रहिवासी मोठ्या प्रमाणात राहतात. अनेकजण हालखीच्या परिस्थितीतही आपले जीवन जगत आहे. अशा परिस्थितीत देखील माणूसकीची जपवणूक करीत सढळ हाताने मदत केली. त्यात नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी विशेष सहकार्य केले.

भारीप बहुजन महासंघाचे घरकुल शाखेचे अध्यक्ष विजय गेडाम, रतन गायकवाड, कैलास लोखंडे, इंद्रसेन गोरे, राजेंद्र बनसोडे, संदीप कांबळे, भागवत सोनकांबळे, राहुल अंभोरे, ज्येष्ठ मार्गदर्शन शफी मनियार, सचिन सकट, दगडू जोगदंड, दत्तात्रय आढाव, रामभाऊ खरात, दीपक मिरपगार, राजू उबाळे,  आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.