Pimpri News:  महापालिकेत बरंच काही चाललंय, पुरावे द्या, चौकशी लावतो : अजित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत बरंच काही चाललं आहे, असे कानावर येते. फक्त कानावर येवून  चालत नाही. त्याचे पुरावे असतील तर मी त्याची चौकशी लावतो, असे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना स्मार्ट वॉचचे वाटप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते चिंचवड येथे पत्रकारांशी बोलत होते. बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून कंत्राट घेत काही ठेकेदारांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यातील 18 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले. तर, फसवणूक केल्याप्रकरणी पाच ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार महापालिकेने पोलिसांकडे दिली आहे.

याबाबत विचारले असता पवार म्हणाले, ”बोगस एफडीआर प्रकरण दाखवा. त्याचे पुरावा द्या. चौकशी लावतो. तसेच महापालिकेत बरंच काही चाललं आहे. असे कानावर येते. फक्त कानावर येवून  चालत नाही. त्याचे पुरावे असतील तर मी त्याची चौकशी लावतो”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.