Talegaon Dabhade News : शासनाच्या कोणत्याही नियमांचं पालन नाही, नागरिकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी उडाली झुंबड

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील नागरिक जोपर्यंत स्वतःहून कोणतीही बाब किंवा संकटला गांभीर्याने बघत नाही. तोपर्यंत शासनाने कोरोना संसर्गाच्या बाबतीत लावलेल्या सर्व अटी व नियम हे फोल ठरतील. असे तळेगावमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी झालेल्या गर्दीवरून दिसून येत आहे.

रविवारचा दिवस म्हणजेच तळेगाव दाभाडे येथील आठवडे बाजाराचा दिवस असतो. सध्या तळेगावसह मावळ तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाची रुग्ण वाढण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने दिनांक 28 रोजी भरणारा आठवडे बाजार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने बंद राहील असे जाहीर केले होते.

दुसऱ्या टप्प्यातील कोरोना संसर्गाच्या दरम्यान मावळ तालुक्यांमध्ये तळेगाव हद्दीमध्ये कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने खबरदारी म्हणून हा आठवडे बाजार एक दिवसासाठी बंद ठेवला होता. परंतु सायंकाळी मारुती मंदिर चौक येथे  भाजीपाला विक्रीची दुकाने चालू राहिली होती. या ठिकाणी नागरिकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही नियमांचं पालन न करता गर्दीची झुंबड उडाली होती.

अशा पद्धतीने नागरिकांनी जर या कोरोना संक्रमणाचं गांभीर्य बाळगलं नाही तर निश्चितच त्याचे परिणाम सर्व तळेगावकरांना सहन करावे लागतील. असं मत गर्दी पाहणारे नागरिक व्यक्त करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.