Cricket Update : 2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नाही – आयसीसी 

There is no reason to doubt the 2011 World Cup final - ICC 2011 सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

एमपीसी न्यूज -2011 ची विश्वचषक फायनल फिक्स होती असा आरोप श्रीलंकेच्या एका क्रिडा मंत्र्याने केल्यानंतर ICC नं स्पष्टीकरण दिलं आहे. 2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नसल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे.

2011 सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. या विजयाच्या 9  वर्षानंतर श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंदा अलुथगामगे यांनी ही मॅच फिक्स असल्याचा आरोप केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी यूनिट’चे जनरल मॅनेजर अ‍ॅलेक्स मार्शल यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 2011 वर्ल्ड कप फायनल सामन्यात फिक्सिंग संबंधी असा एकही पुरावा मिळालेला नाही की ज्यामुळं सामन्यांची चौकशी केली जावी.

मार्शल म्हणाले, ‘आम्हाला 2011 विश्वचषक फायनल सामन्याबाबत संशय घेण्यासारखं एकही कारण मिळालेलं नाही. या सामन्याबाबत फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर आयसीसी इंटीग्रिटी यूनिटने याबाबत चौकशी केली. मात्र या चौकशीत आमच्यासमोर एकही पुरावा आला नाही, की ज्याच्या आधारावर आम्ही हा सामना फिक्स होण्याच्या आरोपाचं समर्थन केलं जाऊ शकेल.

दरम्यान, श्रीलंकेच्या सरकारने फिक्सिंगच्या आरोपांबाबत चौकशीला सुरुवात केली आहे. याच चौकशीचा भाग म्हणून कुमार संगकाराची क्रीडा मंत्रालयाच्या स्पेशल इनव्हेस्टिगेशन युनिटने 10 तास कसून चौकशी केली. त्याआधी श्रीलंका टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष राहिलेल्या अरविंदा डिसिल्वा यांचीही चौकशी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.