Pune : संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि. 26 डिसेंबर) पाणीपुरवठा होणार नाही. पर्वती जलकेंद्र पंपिंग, आरओ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, शुक्रवारी (दि. 27 डिसेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, स्वारगेट, शिवाजीनगर, पर्वती, सहकारनगर, कात्रज, धनकवडी, कोथरूड, कर्वे रोड, एसएनडीटी, कर्वेनगर, पद्मावती, वडगाव, धायरी, कोंढवा, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, वारजे – माळवाडी, बावधन, लष्कर, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, मुंढवा, येरवडा, वानवडी, कोंढवा, हडपसर, चंदननगर, खराडी, टिंगरेनगर, कळस धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, नगररोड भागात संपूर्ण दिवसभर पाणी येणार नाही. तर, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.