Pimpri Corona Update: शहरात 262 रुग्ण झाले बरे, सक्रिय रुग्णांची संख्याही 262

There were 262 patients recovers from corona and 262 active patients total 532 patients in pimpri-chinchwad

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोग्रस्तांचा आकडा 532 वर पोहोचला आहे. त्यापैकी सक्रिय 262 रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 262 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरातील आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज सोमवारी आत्तापर्यंत 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

देशभरात आजपासून अनलॉक 1 सुरु आहे. यामध्ये अनेक सवलती दिल्या आहेत. त्यामुळे जनजीवन पुन्हा पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही अनेक सवलती दिल्या आहेत.

शहराला यापूर्वीच रेडझोनमधून वगळण्यात आले आहे. मागील काही दिवस शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. दोन दिवसांपासून रुग्ण वाढीचे प्रमाण त्या तुलनेत कमी झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला होता. 10 मार्च ते 1 जून या 84 दिवसात औद्योगिकनगरीने पाचशेचा आकडा पार केला आहे.

आजपर्यंत शहरातील 532 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 262 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

262 सक्रिय रुग्णांवर महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, शहरातील 8 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

127 जणांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत
पिंपरी-चिंचवड महापालिका, खासगी रुग्णालयात 262 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 127 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. पण, त्यांच्यात कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत.

तर, 105 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. पुर्वीच्या तुलनेत लक्षणे असलेल्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. 21 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?
कोरोनाने युवकांना अक्षरशः विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 22 ते 39 वयवर्ष असलेल्या 220 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे.

त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 121 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 77 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 56 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 57 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.