Pune News : चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर वाहतूकीत होणार बदल

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीगत लक्ष घातल्यानंतर चांदणी चौकातील रस्त्याचे काम आता जलदगतीने सुरु असून 12 ते 15 सप्टेंबर या कालावधीत पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल पाडल्यानंतर येथील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी दिली आहे.

एनएचएआयने परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार,सध्या चांदणी चौक फ्लायओव्हर व सेवा रस्त्याचे काम 74 टक्के काम पूर्ण झाले असून जून 2023 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाचा एक भाग म्हणून अस्तित्वातील अरुंद पूल (VOP) पाडून त्या ठिकाणी

115 मी. लांब व 36 मी. रुंद नविन पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.त्यामुळे या पुलावरुन सध्या मुळशी ते पाषाण / बावधन, कोथरुड अशी एकेरी वाहतूक सुरु असून, पूल पाडल्यानंतर लगेचच नविन पुलाचे बांधकाम सुरु होईल.यावेळी वाहतूकीत बदल करण्यात आला असून तो पुढील प्रमाणे असेल.

1)      एन.डी.ए./ मुळशी ते बावधन पाषाण वारजे एन.डी.ए. व मुळशीकडून – पाषाण बावधन कोथरुड वारजेकडे जाणारी वाहतूक नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरुन (रम्प क्र.1) वरुन सोडण्यात येईल.

2) एन.डी.ए./ मुळशी मुंबई एन.डी.ए./ मुळशीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक रॅम्प क्र. 3 मार्गे रॅम्प क्र. 7 वरुन सोडण्यात येईल. इतर रॅम्प व हायवेवरील वाहतूक पूर्वीप्रमाणेच राहील.

3) मुंबई ते बावधन / पाषाण कोथरुड मुंबई ते बावधन / पाषाण ही वाहतूक – पाषाण कनेक्टर वरुन सोडण्यात येईल.मुंबई ते कोथरुड ही वाहतूक अस्तित्वातील कोथरुड रॅम्पवरुन खाली सोडण्यात येईल.

4) मुंबई ते मुळशीकडे सोडण्यात येईल.ही वाहतूक कोथरुड अंडरपास एन.डी.ए. चौक मार्गे मुळशी बावधन / पाषाण ते मुंबई सदरील वाहतूक कोथरुड पाषाण कनेक्टर कोथरुडमार्गे वेद विहार एन. डी. ए. रस्त्याकडून मुंबई हायवेवर सोडण्यात येईल.

5) बावधन / पाषाण ते सातारा वारजे सदरील वाहतूक पाषाण कनेक्टर नंतर बावधन / पाषाण ते मुंबई सदरील वाहतूक कोथरुड पाषाण कनेक्टर कोथरुड अंडरपास मार्गे वेदविहार एन.डी.ए रस्त्याकडून मुंबई हायवेवर जोडण्यात येईल.

6) बावधन / पाषाण ते सातारा वारजे सदरील वाहतूक पाषाण कनेक्टर नंतर – हायवेवरुन सातारा व वारजेकडे सोडण्यात येईल. कोथरुड ते मुंबई सदरील वाहतूक कोथरुड अंडरपास ते वेद विहार एन.डी.ए. रस्त्यावरुन ते हायवेवर जोडण्यात येईल.

7) कोथरुड ते एन.डी.ए./ मुळशी ही वाहतूक कोथरुड अंडरपास नंतर एन.डी.ए. रॅम्पवरून एन.डी.ए. कडे व पुढे मुळशीकडे सोडण्यात येईल.

8) कोथरुड ते सातारा / वारजे ही वाहतूक सातारा हायवे सेवा रस्त्यावरील अंगेरीमठा जवळून हायवेवरुन सातारा व वारजेकडे वळविण्यात येईल.

9) सातारा ते एन.डी.ए./ मुळशी सदर वाहतूक वेदभवन सेवा रस्त्यावरुन एन.डी.ए.चौकातून एन.डी.ए.कडे व पुढे मुळशीकडे सोडण्यात येईल.

10). सातारा ते बावधन / पाषाण सदरील वाहतूक रॅम्प 7 ते मुळशी रोड व त्या पुढे नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलावरुन (रॅम्प क. 1) बावधन पाषाण कडे सोडण्यात येईल.

11) सातारा ते कोथरुड ही वाहतूक वेदविहार सेवा रस्त्यावरुन अस्तित्वातील कोथरूड अंडरपास मार्गे सोडण्यात येईल.

वरील प्रकारे वाहतूक नियोजन केले असून सर्व आवश्यक त्या ठिकाणी सूचनाफलक (Sign Boards) मराठी व इंग्रजीतून लावलेले आहेत.नागरिकांनी वरील बदलांची दखल घेत प्रवास करावा असे आवाहन एनएचएआय तर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.