Chandani Chowk : पुण्यातील चांदणी चौक परिसरात आज दुपारी असणार ‘ट्रॅफिक ब्लॉक’

एमपीसी न्यूज : पुण्यातील चांदणी चौक परिसरात आज  दुपारी ट्रॅफिक ब्लॉक (Chandani Chowk) असणार आहे. पुणे वाहतूक पोलीस आणि पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिस उपायुक्त यांनी ही माहिती दिली.

चांदणी चौक परिसरातील पुल पाडल्यानंतर तिथल्या खडक फोडण्याचे काही काम अद्याप बाकी असल्यामुळे आज दिवसभरातून दोन वेळा या मार्गावर वाहतूक 20 मिनिटे वाहतूक बंद केली जाणार आहे.

Pimpri Crime : विवाहितेचा छळ करत तिला तलाक देणाऱ्या सासरच्या मंडळीवर गुन्हा

खडक फोडण्याचे काम ब्लास्ट पद्धतीने होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक 20 मिनिटे बंद केली जाईल. दुपारी 1 ते 2 दरम्यान 200 मीटर लांब गाड्या 20 मिनिटासाठी थांबवल्या जातील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे

दोन बाजूस असलेले सर्व्हिस रोड लवकरात लवकर सुरु व्हावा, यासाठी हे खडक फोडण्याची गरज असल्याकारणाने हे काम आज केले जाणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.