Pune : महाराष्ट्रात या पुढील काळात पाण्यावरून वाद होतील – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – आता राज्यातील जे काही वाद होते ते संपले असून या पुढील काळात पाण्यावरूनच वाद होतील. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे, अशी भूमिका पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. तसेच पुणेकरांनी पाण्याबाबत चिंता करू नये, असे त्यांनी यावेळी सांगितले. बारामतीच्या पाणी प्रश्नावरून शरद पवार यांनी कोणत्या प्रश्नावर राजकारण करायचे याचे तारतम्य असले पाहिजे, असे विधान केले होते. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली.

खासदार गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अन्य मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री पद महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यानंतर आज चंद्रकांत पाटील पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी खासदार गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.