Pune : गड रक्षणासाठी राज्यभर तीव्र आंदोलन करणार – संभाजी बिग्रेड

एमपीसी न्यूज – भाजप- सेना सरकारने शिवरायांचे गड-किल्ले संवर्धनाच्या नावाखाली भाड्याने देण्याच्या हालचाली सुरु केल्याच्या विरोधात संभाजी बिग्रेडकडून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भाजप-सेना सरकार शिवरायांचे गड-किल्ले भाड्याने देऊन गडावर हनिमून साजरे करणार काय ? असा खडा प्रश्न विचारत संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा सरकारला दिला.

भाजप- सेना सरकारने जे धोरण राजस्थान, गोवा सरकारने स्वीकारले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील शिवरायांचे २५ गड किल्ले संवर्धनाच्या नावाखाली भाड्याने देण्याच्या हालचाली सुरु केल्या. परंतू महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराज व असंख्य मावळे यांच्या पराक्रमाचे प्रतिक आहेत. ज्या तानाजी मालुसरे या शूरवीरांनी आपल्या मुलाचे लग्न सोडून “आधी लगीन कोंढाण्याचे” असे म्हटले आहे, असे अनेक लाखो शूर मावळ्यांचे गड किल्ले हे पराक्रमाचे प्रतीक आहेत. हा पराक्रम विसरून जर हे सरकार पर्यटन विकास महामंडळाकडून अशा २५ किल्ल्याची यादी मागवत असेल तर सरकारचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

हे किल्ले  करारावर हॉटेल व्यावसायिकांना रिसॉर्ट तसेच हॉटेलचं नाहीतर लग्न सभारंभ आणि करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देणार आहे, असे करून हे सरकार गडावर सो कॉल्ड हायक्लास थाटात दारूचे घोट रिचवतील व याच हॉटेलमध्ये हनीमून साजरे होतील. त्यामुळे शूर पराक्रमी गडाचे अस्तित्व धोक्यात येईल म्हणून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर रक्तरंजित स्वरूपाचे तीव्र आंदोलन करण्यात येतील याची सरकारने नोंद घ्यावी, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.