Pimpri News: शहरातील देशभक्त, थोर समाज सुधारकांच्या पुतळ्यांची होणार नियमित स्वच्छता

एमपीसी न्यूज : शहारातील नागरिकांना प्रेरणा मिळावी या हेतून महापालिकेने विविध देशभक्त, थोर समाज सुधारक, इतिहासकालिन नेते यांचे पुतळे मोकळ्या जागी उभारले आहेत. या पुतळ्यांची नियमित स्वच्छता होणार आहे. त्यासाठी मास एन्टरप्राईजेस या संस्थेची नियुक्ती केली आहे. पुढील तीन वर्षाकरिता येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना प्रेरणा मिळावी या हेतूनवे महापालिकेने विविध देशभक्त, थोर समाज सुधारक यांचे पुतळे उभारले आहेत. महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 11, ‘ब’ 3, ‘क’ 2, ‘इ’ 1, ‘फ’ 2, ‘ग’ 5 आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 14 तसेच स्थापत्य उद्यानमध्ये 1 असे एकूण 39 पुतळे उभारले आहेत. हे पुतळे बंदिस्त नसून मोकळ्या जागी, मैदानात उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्याची निगा राखणे, स्वच्छता ठेवणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे.

परंतु, नियमितपणे या पुतळ्यांची स्वच्छता होत नाही. त्यामुळे या थोर नेत्यांच्या पुतळ्यांचे पावित्र्य भंग होत आहे. त्यांच्या जयंती, पुण्यतिथी दिवशीच फक्त या पुतळ्यांची स्वच्छता केली जाते.  त्यामुळे शहरात देशभक्त, थोर समाज सुधारक, इतिहासकालिन नेते यांचे पुतळे महापालिकेमार्फत बसविण्यात आले आहेत. त्यांची आरोग्य विभागाकडून नियमितपणे स्वच्छता करणे आवश्यक आहे. त्यासाठी मास एन्टरप्राईजेस या संस्थेची नियुक्ती करुन पुढील 3 वर्षाकरिता येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने सदस्य पारित ठरावाद्वारे मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.