Thergaon: पत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-याला पाच हजार रुपयांचा दंड

एमपीसी न्यूज – थेरगाव-डांगे चौक दत्तनगर येथील बीआरटी बसस्टॉपवर नामांकित कंपनीमध्ये मुले-मुली पाहिजेत, अशी भिंतीपत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-यावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिका ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक 24 डांगे चौक दत्तनगर बीआरटी बसस्टॉप येथे नामांकित कंपनीमध्ये मुले मुली पाहीजेत. या एजन्सीने सार्वजनिक ठिकाणी शहराचे विद्रूपीकरण करत पत्रके चिटकविली होती. त्यामुळे विद्रुपीकरणात भर पडत आहे.

पत्रके चिटकविणा-यावर दंडात्मक कारवाई केली. पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आरोग्य निरीक्षक एस. बी. चन्नाल, कर्मचारी अभय दारुळे, प्रशांत पवार यांनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.