Thergaon : हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव हवी – ॲड. नारायण रसाळ

एमपीसी न्यूज – भारतीय संविधानाने (Thergaon) प्रदान केलेल्या विविध हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव नागरिकांनी ठेवायला हवी! असे विचार पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यांनी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा- पाटील शैक्षणिक संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे शनिवारी (दि.26) व्यक्त केले.

संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती सचिव ॲड. सतीश गोरडे होते; तर पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, ॲड. अक्षय केदार, ॲड. सौरभ जगताप यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती.

Pimpri News: शहरातील 6 हजार 721 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण

यावेळी बाल वर्गातील विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. पाचवीच्या (Thergaon) विद्यार्थ्यांनी गीतांमधून संविधानाला मानवंदना दिली; तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सार्वभौमत्व, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, गणराज्य पद्धती या मूलभूत तत्त्वांची प्रतीके परिधान करून त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. त्यानंतर उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

आशा हुले, स्मिता जोशी, गणेश शिंदे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. वीणा तांबे यांनी प्रास्ताविक केले. सीमा आखाडे यांनी सूत्रसंचालन केले. नटराज जगताप यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.