Thergaon : मतदान जागृती विषयावर रविवारी ऍड अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान

एमपीसी न्यूज – कृपासिंधु महिला मंच आणि प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृतीच्या उद्देशाने महिलांसाठी ऍड अपर्णा रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. थेरगाव येथील मोरया मंगल कार्यालय येथे रविवारी (दि. 17) सायंकाळी 4 ते 7 यावेळेत हे व्याख्यान होणार आहे.

देशभरात लोकशाही बळकट होण्याकरिता, देशहितासाठी सर्वांनी 100 टक्के मतदान करावे , विशेषतः महिलांमध्ये जनजागृती, आजची स्त्री, जागतिकीकरण , सुजाण स्त्रीत्वाचा आयाम आदी विषयांवर अपर्णाताई बोलणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक कविता रूपनर उपस्थित राहणार आहेत.

प्रबोधन मंचातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून मतदारांमध्ये जनजागृती करून 100 टक्के मतदान होण्याकरिता सातत्याने मतदार जागृती मोहीम राबविली जाते. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला असून, या व्याख्यानाला महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृपासिंधु महिला मंच व प्रबोधन मंच महिला विभागाच्या सुवर्णा भोईने यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.