Thergaon : संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी थेरगावात रक्तदान शिबीर

Blood donation camp at Thergaon on Friday on behalf of Sambhaji Brigade : रानुबाई बारणे शाळा, भोरडेनगर, थेरगाव या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकटकाळात सर्वत्र रक्ताचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने शुक्रवारी (दि. 31) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रानुबाई बारणे शाळा, भोरडेनगर, थेरगाव या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्घाटन संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे उपस्थित राहणार आहेत.

कोरोनाच्या संकटात भारतामध्ये महाराष्ट्राची स्थिती नाजूक होत असून यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांना कोरोनाचा मोठा फटका बसताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहता शासकीय वैद्यकीय सेवेवर प्रचंड भार पडताना दिसून येत आहे.

त्यामुळे बऱ्याच हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत तसेच रक्ताचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासून येत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या रक्ताचा फार मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच प्लाझ्माचाही भरपूर प्रमाणात तुटवडा असल्याने प्लाझ्मा दान करण्याचेही आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.