Thergaon : पोवाडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने आयोजित घेण्यात आलेल्या पोवाडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप शुक्रवारी (दि.19) उत्साहात झाला. यशवंतराव चव्हाण प्राथमिक व माध्यमिक विद्यालय थेरगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी महाराष्ट्र शाहीर परिषदेचे कार्याध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे ,शाहीर वनिता मोहिते, शाहीर प्रचिति भिष्णुरकर, शाहीर स्मिता बांदीवडेकर, उद्योजिका मनीषा पाटील, राजेन्द्र आहेर उपस्थित होते. इयत्ता पाचवी ते आठवीच्या सुमारे ऐंशी विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांनी शाहिरी गण, मुजरा, पारंपरिक गोंधळ, महाराष्ट्र गीत, फटका, गौरव गीत, विविध पोवाडे सादर करून शाबासकीची थाप मिळवली.

  • शाहीर प्रकाश ढवळे यानी शाहिरीमधील विविध प्रकार, त्याच सादरीकरण कसे क़रावे इतिहास व सध्यस्थिती याची सांगड घालून मनोरंजन व प्रबोधन कसे करावे याचे  प्रात्यक्षिक पोवाड्यामधुन सादर क़रुन दाखवले. याप्रसंगी शाहीर वनिता मोहिते व मनीषा पाटील यानी मनोगत व्यक्त केले.
मुख्याध्यापिका वर्षा गणबावले, प्रशिक्षक राजेंद्र आहेर, रजनी आहेर, संगीता आव्हाड, शिवाजी दौंडकर, ऊर्मिला राजे यांनी शिबिराच्या संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र आहेर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.