Thergaon Cricket News : सम्राट प्रिमियर लिगमध्ये विश्वा टायगर्सची बाजी

दिलीप वेंगसकर, खासदार बारणे व कृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

एमपीसी न्यूज – सम्राट प्रिमियर लिग (एसपीएल) या क्रिकेट स्पर्धेत विश्वा टायगर्स या संघाने बाजी मारली. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसकर, खासदार श्रीरंग बारणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

सम्राट प्रिमियर लिगचे (एसपीएल) यंदा दुसरे वर्ष होते. थेगावमधील वेंगसकर क्रिकेट अकॅडमीत ही स्पर्धा पार पडली. या क्रिकेट स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते. मोरया फायटर व विश्वा टायगर्स या संघात अंतिम लढत झाली. त्यात विश्वा टायगर्सने अप्रतिम खेळी करत एसपीएल चषकावर आपले नाव कोरले.

स्पर्धेच्या परितोषिक वितरण समारंभाला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली. क्रिकेट खूप खेळलो, पण असा गेट टुगेदर मी कधीच पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया वेंगसकर यांनी यावेळी दिली.

याशिवाय परितोषिक वितरण समारंभाला खासदार श्रीरंग बारणे व पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश देखील उपस्थित होते.

थेरगाव सोशल फाऊंडेशनचे निलेश पिंगळे म्हणाले, एसपीएल हा गणपती मंडळांचा गेट टुगेदर आहे. या मध्ये सहा संघ तयार केले जातात. संघमालक होण्याची इच्छा असणाऱ्यांना संघमालक करून खेळाडूंची सहा संघात बोली पद्धतीने विभागणी केली जाते. त्या नंतर सर्व स्पर्धेसाठी येणा-या खर्चाचं ताळेबंद काढून स्पर्धा खेळवली जाते. अंतिम विजेते काढून पारितोषिकं वितरित केली जातात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा तसेच एकत्र यावं हा या स्पर्धे मागचा उद्देश असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.