Thergaon Crime News : पाठलाग करत दगड आणि कोयत्याने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दोन मित्र मित्राच्या आईसोबत बोलत थांबले असताना रिक्षातून आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग करून मारहाण केली. एकाला कोयत्याने तर दुसऱ्याला दगडाने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 6) दुपारी दोन वाजता थेरगाव येथे घडली.

इलियास अकबर शेख (वय 34, रा. पवार नगर, थेरगाव), आकाश साळवे अशी जखमींची नावे आहेत.

शेख यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रॉकी उर्फ विजय जोगदंड, राहुल कसबे, शुभम नांगरे (सर्व रा. अण्णाभाऊ साठे नगर, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोन वाजता फिर्यादी शेख, त्यांचा मित्र आकाश साळवे हे शेख यांच्या आईसोबत बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी रिक्षामधून (एमएच 14 / जीसी 5012) आले.

आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत ‘तुला लय मस्ती आली आहे का, आज तुझ्याकडे बघून घेतो’ अशी धमकी दिली. फिर्यादी आणि त्यांचा मित्र आरोपींना पाहून पळू लागले.

त्यावेळी आरोपी रॉकी याने फिर्यादी यांना कोयता फेकून मारून जखमी केले. तर त्यांचा मित्र आकाश साळवे याला दगडाने मारून जखमी केले. मारहाण करून आरोपी पळून गेले.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.