Thergaon Crime News : भाडे मागितल्यावरुन वाद; घर मालकिणीच्या नातीचा भाडेकरूकडून विनयभंग

0

एमपीसी न्यूज – घर मालकिणीने भाडेकरू महिलेला भाडे मागितले. त्यावरुन भाडेकरु महिलेने शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता भाडेकरूंनी घरात बोलावून महिलेचा विनयभंग केला. थेरगाव येथे 15 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. 21) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 35 वर्षीय महिला व 19 वर्षीय तरुणासह तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या आजीने भाडेकरू असलेल्या आरोपी महिलेकडे भाडे मागितले. त्यावरून आरोपी महिलेने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही माझ्या आजीस शिवीगाळ का करता’, असे म्हणून फिर्यादी महिलेने जाब विचारला. ‘तू घरामध्ये ये’, असे म्हणून आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला घरात बोलावले.

‘तेरेको ब्रिज के निचे फेक दुंगी’, अशी धमकी आरोपी महिलेने दिली. आरोपींनी फिर्यादी महिलेला मारहाण केली. तसेच आरोपी तरुणाने फिर्यादी महिलेचा विनयभंग केला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment