Thergaon Crime News : तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार, मारहाण करून रोकड हिसकावली

एमपीसी न्यूज – तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार करुन दरोडा टाकल्याची घटना थेरगावमध्ये घडली. एकमेकांचे गट सोडल्याने तृतीयपंथीयांमध्ये वाद झाला. त्यातून दोन जणांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल व रोकड जबरदस्तीने काढून घेतली. थेरगावात सोमवारी (दि.31) ही घटना घडली.

या प्रकरणी रुक्सार उर्फ इरफान इन्साफ खान, आजम शेख (दोघेही रा. गोवंडी ईस्ट, मुंबई ), अनम, सिमरन उर्फ पवन (गोवंडी इस्ट, मुंबई) व तीन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तृतीय पंथी व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आजम शेख हा आरोपी रुक्सार खान हिचा पती आहे. तसेच रुक्सार खानसह इतर आरोपी व फिर्यादी हे तृतीयपंथी आहेत. एकमेकांचे गट सोडून आल्याने त्यांच्यात वाद आहे. आरोपी रुक्सार खान ही फिर्यादीची पूर्वीची गुरू आहे. आरोपींनी फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला उलटा चॉपर मारून जखमी केले.

तसेच फिर्यादी व तिच्या मैत्रिणीकडील मोबाईल तसेच फिर्यादीकडील 30 हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच आरोपी आजम याने फिर्यादीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.