Thergaon Crime News : थेरगावातील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; आठ जणांना अटक

0

एमपीसी न्यूज – पैशावर जुगार खेळणाऱ्या आठ जुगाऱ्यांना पोलिसांनी छापा घालून अटक केली. बुधवारी (दि. 7) दुपारी थेरगाव येथे सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.

जुगार चालक मालक दुर्गाराम रुपाराम पटेल (वय 45, रा. मयुर पवार बिल्डींग, पवार नगर, थेरगाव) रामदास मारुती जांभुळकर (वय 37, रा. आयोध्या बिल्डींग, शिंदेनगर, जुनी सांगवी), दिलीप बजरंग बारणे (वय 61 रा. पदमजी पेपर मिल समोर, थेरगाव), बाबासाहेब सिताराम सुर्यवंशी (वय 48 रा. गुरव चाळ, सोळा नंबर, थेरगाव), ज्ञानोबा ईश्वर पाटील (वय 40 रा. पदमजी पेपर मिल समोर, थेरगाव), संजय रोहीदास मोरे (वय 36, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), संजय मच्छिंद्र मिसाळ (वय 41, रा. कावेरी भाजीमंडई जवळ, थेरगाव), मंगेश सुदाम केदारी (वय 36, रा. सोळा नंबर बस स्टॉप, बेलठिका नगर, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस नाईक भगवंता चिंधू मुठे (वय 35) यांनी बुधवारी (दि. 7) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारनगर, थेरगावातील मयुर पवार यांच्या बिल्डींगमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा घालून आरोपींना जुगार खेळताना अटक केली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment