Thergaon Crime News : वाकड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

एमपीसी न्यूज – थेरगावातील धनगर बाबा मंदिराच्या जवळ सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर वाकड पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी 47 हजार 140 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. तर, तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

शशिकांत भीमाशंकर गोगी (वय 30, रा. वाकड), रवी पेंटर (रा. वाकड), रणजित (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक सचिन कुबेर जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराच्या जवळ जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यात पोलिसांनी जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 47 हजार 140 रुपयांचा ऐवज जप्त केला. तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.