Thergaon Crime : थेरगाव येथून कोयत्या सह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : बेकायदेशीररित्या कोयता बाळगणाऱ्या तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 1) मध्यरात्री दगडू पाटील नगर, (Thergaon Crime) थेरगाव येथे करण्यात आली.

अनिकेत संतोष कांबळे (वय 19, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यानुसार पोलीस नाईक दत्तप्रसाद चौधरी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wildlife Week : वन्यजीव सप्ताहा निमीत्त विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या घुबड या पक्षाबद्दल च्या श्रद्धा व अंधश्रद्धा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे शस्त्र असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत कांबळे याला ताब्यात घेतले.(Thergaon Crime) त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता मिळून आला. पोलिसांनी कोयता आणि बुलेट असा 50 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.