BNR-HDR-TOP-Mobile

Thergaon: मॅकडॉनल्ड्समधील बेसमेंटच्या साठलेल्या पाण्यात सापडल्या डेंगूच्या अळ्या

महापालिकेकडून दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – थेरगाव, संतोषनगर येथील मॅकडॉनल्ड्समधील बेसमेंटच्या साठलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मॅकडॉनल्ड्सला नोटीस देत पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

थेरगाव, संतोषनगर 16 नंबर येथे मॅकडॉनल्ड्स आहे. पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने किटकजन्य मास सर्वेक्षण अंतर्गत या मॅकडॉनल्ड्सची पाहणी केली. मॅकडॉनल्ड्समधील बेसमेंटमध्ये पाणी साठलेले होते. या साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यू डासांच्या अळ्यांची उत्पत्ती झाली होती.

त्यामुळे आरोग्य विभागाने या मॅकडॉनल्ड्सवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच त्यांना नोटीस देण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक इंगेवाड, संजय कोळी, ओ. मू. झेंडे, फवारणी कर्मचारी अक्षय तावर, अस्वले, माकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

.