Thergaon : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेचा विनयभंग; पीडित महिलेची वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद

एमपीसी न्यूज – नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी करते म्हणून एका महिलेचा घरात घुसून तिचा विनयभंग केला. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. 6) दुपारी घडली.

शाहीद हमीद गोलंदाज (वय 45, रा. गणेशनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 40 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आरोपी शाहीद हा फिर्यादी महिलेच्या घरात घुसला. आमच्या नवरा-बायकोच्या भांडणात मध्ये का येते?, असे म्हणत आरोपीने फिर्यादी महिलेची कपडे फाडत तिचा विनयभंग केला.

तसेच फिर्यादी यांच्या मुलीलाही शिवीगाळ करीत लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे  करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.