Thergaon : कबड्डी खेळाडूंना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या क्रीडा, कला विकास प्रकल्प (Thergaon) कबड्डी संघाच्या व माध्यमिक विद्यालय थेरगावच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या कबड्डी खेळाडूंना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालय थेरगाव येथील कबड्डी मैदानावर सोमवारी (दि. 10) हा कार्यक्रम झाला.

यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच तथा पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर कार्यवाहक दत्तात्रय झिंजुर्डे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब तांबे, मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, उपशिक्षक कृष्णकांत टकले, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सोनाली जाधव, संतोष बारणे, कुस्ती प्रशिक्षक कालिदास लांडगे, आयेशा मत्तिको, श्रीपाद जवळेकर, मंदार दीक्षित, मेघा खराडे, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

Akurdi : नालेसफाईकडे लक्ष्य वेधण्यासाठी उद्या राष्ट्रवादीचे नाल्यात बसून लाक्षणिक उपोषण

स्पोर्ट इंडिच्या संचालिका व व्यवस्थापिका सुप्रिया बडवे आणि बेल राईस इंडस्ट्रीच्या कार्यकारी संचालिका श्रीमती बडवे यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात या खेळाडूंना त्यांच्या कंपनीमध्ये कौशल्य प्रशिक्षण देऊन नोकरी देण्याचे आश्वासन दिले. खेळाडूंनी तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन दत्तात्रय झिंजुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार (Thergaon) यांनी ‘स्पोर्ट्स आणि करिअर’ या विषयावर खेळाडूंना मार्गदर्शन केले. “आपल्याकडे असलेल्या राज्य आणि राष्ट्रीय प्रमाणपत्रांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून शासकीय नोकरीच्या रूपाने कॅश करावे”, असा सल्ला त्यांनी खेळाडूंना दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले. बन्सी आटवे यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.