Thergaon : खिंवसरा पाटील विदयामंदिर शाळेला ईएसीएचा प्रथम क्रमांक

पर्यावरण दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; ९७ शाळांचा सहभाग

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या पर्यावरण संवर्धन समितीतर्फे (ECA) मागील वर्षभर पर्यावरणावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात आले होते. यात एकूण सहभागी 97 शाळांतून गणेशनगर थेरगाव येथील खिंवसरा पाटील विदयामंदिर या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.

पिंपरी-चिंचवड मनपाच्या हद्दीत एकूण सहाशे शाळांपैकी 97 सहभागी झाल्या होत्या. उत्तम उपक्रम व स्पर्धेत कामगिरी केलेल्या 97 शाळेपैकी 13 शाळेची निवड करण्यात आली होती त्यापैकी खिंवसरा पाटील विदयामंदिर या शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केला शाळेला महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून पारितोषिक प्रदान करण्यात आले.

  • या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर, माजी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, पर्यावरण समितीचे ,संजय कुलकर्णी व पर्यावरण संर्वधन समितीचे अध्यक्ष विकास पाटील तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे व्यवस्थापक सिध्देश्वर इंगळे, सीमा आखाडे, दिपाली नाईक, नीता साळवे, पुष्पा जाधव, वनिता बकरे व सुनिता घोडे आदी शिक्षिका तसेच विदयार्थीनी उपस्थित होत्या.

यावेळी सविता पाठक व सीमा आखाडे या शिक्षकांचे मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी विशेष अभिनंदन केले. सर्व संस्थेचे पदाधिकारी, पालक, विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पुरस्कार प्राप्त झाल्याचे मुख्याध्यापक जगताप म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.