Thergaon Encroachment Action : महापालिकेची अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम सुरूच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी (Thergaon Encroachment Action) व अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाची अनधिकृत बांधकामावरील धडक कारवाई सुरुच आहे. थेरगाव येथील अनधिकृत बांधकामांवर आज (बुधवारी 25 मे) कारवाई करण्यात आली.

महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, टपऱ्या काढण्यात येत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज कारवाई सुरु आहे.

Maval Encroachment Action : पवनानगर रोडवर पीएमआरडीएची अतिक्रमण कारवाई

‘ग’ क्षेत्रीय कार्याअंतर्गत थेरगाव दगडूपाटील नगर (Thergaon Encroachment Action) येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. 6 आरसीसी, 5  पत्राशेड पाडण्यात आले.  या कारवाईत अंदाजे 17086 चौरस फूट बांधकामाच्या क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.