Thergaon : पन्नास हजारांचे साहित्य चोरीस; अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हातगाडीवर झाकून ठेवलेला पन्नास हजार रुपयांचे कटलरी साहित्य चोरटयांनी चोरून नेले. ही घटना जगतापनगर, थेरगाव येथे उघडकीस आली.

हनुमान नाना गाडे (वय 43, रा. जगतापनगर, थेरगाव) यांनी शनिवारी (दि. 12) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडे यांचा ‘कटलरी’ वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. 30 ऑगस्ट रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे हातगाडीवर 50 हजार रुपये किमतीचा माल झाकून ठेवला होता.

दरम्यान, चोरटयांनी तो चोरुन नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी माल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.