Thergaon : थेरगाव सोशल फाऊंडेशनचा पहिला वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज- थेरगाव सोशल फाऊंडेशनचा पहिला वर्धापन दिन थेरगावमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरवात अथर्व धुमाळ यांच्या तबला वादनाने झाली. मागील वर्षभरात थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी थेरगाव सोशल फाऊंडेशन (टीएसएफ) च्या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले. अनिकेत प्रभू यांनी वेबसाईट विषयी माहिती दिली. आता थेरगाव मधील नागरीक आपल्या समस्या [email protected] यावर नोंदवू शकतात.

यावेळी थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या पद आणि जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. २०१९ चा रोडमॅप कसा असावा यावर चर्चा झाली, सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले व नंतर फाऊंडेशनचे राहुल सरवदे आणि अनिल घोडेकर यांनी आभार मानले. निलेश पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.